Pune BJP | महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी ‘ऍक्शन मोड’वर, सदस्य नोंदणी अभियानाने रणशिंग फुंकणार – धीरज घाटे

पुणे – Pune BJP | नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता पुणे महानगरपालिकेवर सुद्धा भारतीय जनता पार्टीचा भगवा फडकविणार असल्याचे प्रतिपादन शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांनी केले.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुणे शहरात ८ ही मतदारसंघात सदस्य नोंदणी अभियानाचा प्रारंभ होत आहे ह्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली प्रत्येक मतदारसंघात कमीत कमी ५० हजार सदस्य तसेच प्रत्येक प्रभागात कमीतकमी १० हजार सदस्य नोंदणीचा संकल्प यावेळी करण्यात आला या अभियानाचे प्रमुख म्हणून पुणे शहर सरचिटणीस राघवेंद्र उर्फ बापु मानकर यांची निवड या वेळी करण्यात आली.या साठी 8888002024 हा क्रमांकावर मिस कॉल देऊन सदस्य होता येणार आहे.
या वेळी बोलताना शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले ‘ देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर जनतेने विश्वास दाखवत शाश्वत विकासाला प्राधान्य देत जे प्रेम भारतीय जनता पार्टीला दाखवले आहे सामान्य नागरिक भारतीय जनता पार्टी शी जोडू इच्छित आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीने राष्ट्रीय स्तरावर सदस्य नोंदणी अभियान सुरू केले आहे त्याचा एक भाग म्हणून शहरामध्ये सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे ह्या अभियानामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करतील असा विश्वास आहे’.
या बैठकीला सरचिटणीस पुनीत जोशी , रवींद्र साळेगावकर, वर्षा तापकीर ,सुभाष जंगले राघवेंद्र मानकर , प्रमोद कोंढरे , राजेंद्र शिळीमकर, राहुल भंडारे,महेश पुंडे, सुशील मेंगडे यांच्या सह माजी नगरसेवक शहर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.