No Confidence Motion | राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव ! भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना

एन.पी.न्यूज ऑनलाईन – No Confidence Motion | राज्यसभेचे सभापती जयदीप धनखड यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी मंगळवारी अविश्वास प्रस्ताव आणला. भारताच्या संसदीय इतिहासातील अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई ठरली.
सध्या सुरू असलेले संसदेचे अधिवेशन विविध मुद्दयांनी गाजत आहे. सकाळी अदानी समूहांवर झालेल्या आरोपांची चौकशी करण्याच्या मागणीवरून इंडिया आघाडीने संसदेच्या बाहेर घोषणाबाजी केल्या. दरम्यान काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी एक्सवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात म्हटले आहे की, इंडिया आघाडीतील पक्षांनी राज्यसभेचे सभापती जयदीप धनखड यांच्याविरोधात राज्यसभेच्या मुख्य सचिवांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.
या अविश्वास प्रस्तावावर सुमारे 70 खासदारांनी स्वाक्षर्या केल्य आहेत. त्यात काँग्रेस, बंगालमधील सत्ताधारी तृ़णमूल काँग्रेस, अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष, अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष, तामिळनाडूचा द्रमुक आणि लालू यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या सदयस्यांचा समावेश आहे. राज्यसभेतील संख्याबळ पाहता हा प्रस्ताव नामंजूर होण्याची शक्यता आहे. मात्र विरोधकांना सभापती त्यांना सभागृहात बोलण्याची संधी देत नाहीत, हे सिध्द करायचे आहे.
दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब
आज दोन्ही सभागृहांचे कामकाज चालू झाले तेव्हा सत्ताधाऱ्यांनी जॉर्ज सोरोस यांचा तर विरोधीपक्षांनी उद्योगपती गौतम अदाणी यांचा मुद्दा उचलून धरला आहे. या मुद्द्यांवरूनच सत्ताधारी तसेच विरोधकांनी केलेल्या गोंधळानंतर आधी लोकसभेची तर नंतर राज्यसभेची कार्यवाही उद्या सकाळी ११ पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित केल्यानंतर विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसद भवन परिसरात जोरदार घोषणाबाजी करत अदाणी यांच्याबाबतच्या मुद्द्यांवर सरकारकडून उत्तराची मागणी केली.
https://x.com/Jairam_Ramesh/status/1866395699547668621?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1866395699547668621%7Ctwgr%5E7a93b0339555f99d940eabca00eb72183e840910%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fdesh-videsh%2Fopposition-moves-no-confidence-motion-against-vice-president-jagdeep-dhankhar-aam-93-4761218%2F