MLA Yogesh Tilekar On Satish Wagh Murder | मामाच्या हत्येनंतर आमदार योगेश टिळेकर यांची प्रतिक्रिया; म्हणाले – ‘माझ्या कुटुंबावर मोठा आघात, सर्वजण धक्क्यात आहोत’ (Video)

पुणे : MLA Yogesh Tilekar On Satish Wagh Murder | भाजपचे नेते, विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश सातबा वाघ (वय-५८, रा- मांजरी) यांचे मांजरी येथून सोमवारी सकाळी पहाटेच्या सुमारास अपहरण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच उरुळी कांचन पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सायंकाळी त्यांचा मृतदेह आढळला.

त्यांच्या डोक्यावर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले होते. या घटनेला २४ तास उलटून गेल्यानंतरही अद्याप आरोपींचा शोध लागलेला नाही. मात्र पोलिस पूर्ण क्षमतेने आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती योगेश टिळेकर यांनी दिली आहे.

योगेश टिळेकर म्हणाले, ” “काल माझ्या मामांचे अपहरण करून नंतर खून करण्यात आला. ही घटना घडल्यापासून पोलिस यंत्रणा अतिशय सक्षमपणे काम करत आहे आणि पोलिस लवकरच या प्रकरणाचा सुगावा लावतील. या घटनेने माझ्या कुटुंबावर मोठा आघात झाला असून माझ्यासह आई आणि इतर सर्वजणच धक्क्यात आहेत”, अशा शब्दात योगेश टिळेकर यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत.