Khadki Pune Crime News | पूर्व वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करुन खुनाचा प्रयत्न

पुणे : Khadki Pune Crime News | पूर्व वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार (Koyta Attack) करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न (Attempt To Murder) करण्यात आला आहे. याबाबत संदीप सुनिल कवाळे (वय २७, रा. आंबेडकर चौक, औंध रोड, खडकी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अभिजीत प्रदिप मोरे Abhijeet Pradeep More (वय ३८, रा. चव्हाण वस्ती, बोपोडी) याला अटक केली आहे. हा प्रकार बोपोडीतील भाऊ पाटील रोडवरील (Bhau Patil Road Bopodi) साई मंदिर येथे शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप कवाळे आणि अभिजीत मोरे यांच्यात यापूर्वी भांडणे झाली होती. संदीप कवाळे हा भाऊ पाटील रोडवर रात्री आला असताना अभिजीत मोरे याने जुन्या भांडणाच्या कारणावरुन त्याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. सहायक पोलीस निरीक्षक देशमुख तपास करीत आहेत.