Hadapsar Pune Crime News | आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण; पुणे शहरात खळबळ

पुणे : Hadapsar Pune Crime News | विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) यांचे मामा सतीश वाघ (Satish Wagh) यांचे अपहरण करण्यात आले आहे (Kidnapping Case) . चारचाकी वाहनातून आलेल्या चौघा जणांनी त्यांचे अपहरण केल्याची माहिती आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सतीश वाघ हे आज (दि.९) सकाळच्या सुमारास सोलापूर रस्त्यावरील ब्लु बेरी हॉटेल (Blueberri Hotel Pune) समोर थांबले होते. यावेळी अचानक एक चारचाकी गाडी त्यांच्या समोर येऊन थांबली. त्या गाडीतून दोन अपहरणकर्ते बाहेर आले. त्यांनी जबरदस्तीने वाघ यांना गाडीत बसवून त्यांचे अपहरण केले.

दरम्यान, याप्रकरणी सतीश वाघ यांच्या मुलाने हडपसर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे हडपसर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अपहरणकर्ते त्यांना घेऊन सोलापूरच्या दिशेने गेल्याची माहिती सतीश वाघ यांच्या मुलाने पोलिसांना दिली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहे.