Kolhapur Crime News | दुर्दैवी ! ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक डोक्यावरून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

Kolhapur Crime News

कोल्हापूर : Kolhapur Crime News | ऊस वाहतूक करणाऱ्या रिकाम्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक डोक्यावरून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना कवठेगुलंद (माळभाग ता. शिरोळ) येथे घडली. संजय राघोबा गडगे (वय ५०, रा. बुबनाळ, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या अपघाताची नोंद कुरुंदवाड पोलिसात करण्यात आली आहे. पोलिसांनी ट्रॅक्टरचालक संतोष आण्णाप्पा बेळवी (मु.पो. यल्लूर, ता.चिक्कोडी, जि.बेळगाव) याला ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय गडगे सकाळी दूध घेऊन माळभाग येथून घराकडे निघाले होते. ट्रॅक्टर- ट्रॉली मुख्य रस्त्यावर एका हॉटेलजवळ थांबली होती. अचानक ट्रॅक्टर (के. ऐ. २३ टी. बी. ५८१०) रिकाम्या दोन ट्रॉल्या जोडून जात असताना मागच्या ट्रॉलीचा धक्का संजय यांना लागून ते खाली पडले. त्याचवेळी डोक्यावरून मागच्या ट्रॉलीचे चाक गेले. उपचारासाठी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.