Harshvardhan Patil Meets CM Devendra Fadnavis | राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन पाटलांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क

मुंबई : Harshvardhan Patil Meets CM Devendra Fadnavis | राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी (दि.५) शपथ घेतली. दरम्यान नुकताच भाजपला रामराम करून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी समाजमाध्यमात पोस्ट करत माहिती दिली आहे. पाटील यांनी पोस्टमध्ये म्हंटले आहे की , “आज देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तसेच एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. आपल्या हातून राज्यातील जनतेची सेवा घडेल, आपले राज्य बलशाही बनेल, या सदिच्छा व्यक्त करतो. आपल्या राज्यातील शेतकरी, कष्टकरी, तरुणांच्या हिताचे निर्णय होतील, हीच अपेक्षा. त्यांना उज्वल महाराष्ट्र घडवण्याची पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.”
इंदापूर विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील यांना तिकीट मिळत नव्हतं म्हणून त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. या निवडणुकीत त्यांचा पुन्हा पराभव झाला. दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीत हर्षवर्धन पाटील यांना मानाचं स्थान देण्यात आले आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी थेट देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याने विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.