Aids and Sexual Health Awareness Camp Budhwar Peth Pune | पुणे : बुधवार पेठ येथे एड्स व लैंगिक आरोग्य जनजागृती मेळावा संपन्न

पुणे : Aids and Sexual Health Awareness Camp Budhwar Peth Pune | जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधत जिल्ह्यात जनजागृतीपर पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले असून औंध रुग्णालयाचे एडस् प्रतिबंध व नियंत्रण विभाग व पुणे शहर एड्स कंट्रोल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार पेठ रामेश्वर मार्केट येथे लक्षगट भगिनीकरीता एड्स व लैंगिक आरोग्य जनजागृती करीता मेळावा आयोजित करण्यात आला.
यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुधीर सरवदे एडस् संसर्गितांचे मूलभूत हक्क प्रदान करणारा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कायदा, लैंगिक आरोग्य आदीबाबत माहिती दिली. यावेळी उपस्थित महिलांच्या शंकाचे निरसन करण्यात आले.
पुणे शहर एड्स नियंत्रण सोसायटीचे कर्मचारी, आयसीटीसी व डीएसआसी विभाग ससून रुग्णालय, सोनावणे रुग्णालय, दळवी रुग्णालय, औंध रुग्णालयाचे कर्मचारी, जॉन पॉल स्लम डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, मंथन फाउंडेशन, रिलीफ फाउंडेशन या अशासकीय संस्थेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.