Uday Joshi Arrest | भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी याला अटक; निनाद नागरी सहकारी पतसंस्थेत केली होती 1 कोटी 79 लाख रुपयांची फसवणूक

पुणे : Uday Joshi Arrest | नागरिकांना जादा परताव्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ठेवी घेऊन जवळपास १ कोटी ७९ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी याला अटक केली आहे. (Cheating Fraud Case)
भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक उदय त्र्यंबक जोशी व त्यांचा मुलगा मयुरेश जोशी (Mayuresh Uday Joshi) यांच्यावर वेगवेगळे फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांची गॅस एजन्सी होती. त्यात गुंतवणुक करायला लावून त्याने अनेकांची फसवणूक केली होती. एका ठेकेदारासह ९ जणांची ५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) दाखल आहे. याबरोबरच महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण (MPID Act) अंतर्गत एक गुन्हा दाखल करण्यात आला होता.
निनाद नागरी सहकारी पतसंस्थेत ठेव ठेवल्यास बँकांपेक्षा अधिक व्याज देऊ, असे आमिष दाखवून उदय जोशी याने अनेकांकडून ठेवी गोळा केल्या. सुमारे १ कोटी ७९ लाख रुपयांच्या ठेवी गोळा केल्यानंतर त्या परत न केल्याने नागरिकांनी फसवणूकीची फिर्याद दिली होती.
याबाबत प्रतिभा विलास पानसे (वय ७८, रा. शोभानगर सोसायटी, सहकारनगर) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी उदय जोशाी, शुभदा जोशी, मयूरेश जोशी, रामलिंग शिवणगे, अशोक कुलकर्णी, वल्लभ जोशी, माजी अध्यक्ष मिथिलेश घोलप व विलास बाम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)
फिर्यादी यांचे पती सेवानिवृत्त असून पेन्शनवर कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालतो. आरोपी उदय जोशी याची निनाद नागरी सहकारी पतसंस्था असून तो अध्यक्ष आहे. पानसे व उदय जोशी हे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. आरोपींनी पानसे यांना प्रलोभन दाखविले की तुम्ही जर आमच्या पतसंस्थेत ठेव ठेवली तर बँकेपेक्षा जादा व्याज देऊ़ तसेच ज्येष्ठांना एक टक्का जास्त व्याज देतो, असे सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांनी निनाद पतसंस्थेत ठेव ठेवली. मुदतीनंतर त्यांनी पैसे परत मागितले तर त्यांना हकलून देण्यात आले होते.
विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार (Vijaymala Pawar Sr PI) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग वाघमारे (Pandurang Waghmare API) यांनी उदय जोशी याला अटक केली आहे.