Devendra Fadnavis | ‘मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष…’ ; फडणवीसांनी घेतली तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ

मुंबई : Devendra Fadnavis | महाराष्ट्र राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा सुरु असून या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह देशभरातील अनेक मान्यवर, धर्मगुरू, संत महंत उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले होते. २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केली आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केली आहे.