Yerawada Pune Crime News | प्रियकराच्या मानसिक त्रासामुळे अल्पवयीन मुलीची आत्महत्या; येरवड्यातील घटना

Suicide Case

पुणे : Yerawada Pune Crime News | भुलभापा देऊन प्रेमात पाडल्यानंतर प्रियकराने मानसिक त्रास दिल्याने एका १७ वर्षाच्या मुलीने राहत्या घरी साडीने गळफास (Hanging Case) घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Yerawada Police) केविन चंदेवळ (वय १८, रा. येरवडा) याला अटक केली आहे. ही घटना येरवड्यातील भाजी मार्केट येथील मुलीच्या घरी सोमवारी रात्री दहा वाजता घडली.

याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची १७ वर्षांची अल्पवयीन मुलगी हिला केविन चंदेवळ याने भुलथापा देऊन प्रेमात पाडले. दोघांचे प्रेमसंबंध असताना केविन हा तिला मानसिक त्रास देऊ लागला. त्यामुळे तिचे मानसिक संतुलन बिघडले. त्यातूनच तिने सोमवारी रात्री घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, गुन्हे निरीक्षक स्वाती खेडकर, सहायक पोलीस निरीक्षक सुनिल सोळुंके यांनी घटनास्थळाला भेट दिली़ पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून केविन चंदेवळ याला अटक केली आहे. गुन्हे निरीक्षक स्वाती खेडकर (PI Swati Khedkar) तपास करीत आहेत.