Ramtekadi Pune Crime News | पुण्यात भररस्त्यात हत्येचा थरार! पूर्व वैमनस्यातून महाविद्यालयीन तरुणाचा कोयत्याने सपासप वार करुन खुन

पुणे : Ramtekadi Pune Crime News | पूर्व वैमनस्यातून महाविद्यालयात जात असलेल्या तरुणाला दोघांनी कोयत्याने वार (Koyta Attack) करुन त्याचा खून केला (Murder Case). यश सुनील घाटे Yash Sunil Ghate (वय १७, रा. अंधशाळेसमोर, रामटेकडी, हडपसर – Hadpasar) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत प्रज्वल सुनील घाटे (वय २०, रा. रामनगर, रामटेकडी, हडपसर) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी साहिल लतीफ शेख Sahil Latif Shaikh (वय १८) आणि ताहीर खलील पठाण Tahir Khalil Pathan (वय १८, रा. सर्व्हे नंबर ११०, रामटेकडी, हडपसर) यांना अटक केली आहे. ही घटना रामटेकडी येथील जामा मस्जिदसमोर मंगळवारी सकाळी ७ वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ यश घाटे व त्याचे मित्र आदित्य चव्हाण, रेहान पठाण, श्रेयश शिंदे हे रामटेकडी येथून कॉलेजला जात होते. जामा मस्जिद येथे ते आले असताना साहिल शेख व ताहीर पठाण यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरुन यश घाटे याच्यावर कोयत्याने वार करुन जीवे ठार मारले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी साहिल शेख व ताहीर पठाण यांचा शोध घेऊन दोघांना अटक केली.