Pune Crime Branch News | संशयास्पदरित्या थांबलेला निघाला वाहन चोर

पुणे : Pune Crime Branch News | गुन्हे शाखेच्या युनिट ५ चे पथक हडपसर (Hadapsar) परिसरात पेट्रोलिंग करत असताना संशयास्पदरित्या थांबलेल्या वाहनचालकाला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर तो वाहनचोर असल्याचे आढळून आले. (Vehicle Theft Detection)

प्रमोद मोहन सोनटक्के Pramod Mohan Sontakke (रा. डी पी रोड, माळवाडी, हडपसर, मुळ रा. येणेगुर, ता.उमरगा, जि़. धाराशिव) असे या वाहन चोरट्याचे नाव आहे. (Arrest In Vehicle Theft)

गुन्हे शाखेच्या युनिट ५ चे पथक मंगळवारी हडपसर परिसरात पेट्रोलिंग करीत होते. हडपसर गाडीतळ येथील गांधी चौकाजवळ मोटरसायकलसह एक जण संशयास्पदरित्या थांबलेला आढळून आला. त्याच्याजवळील मोटरसायकलची चौकशी केली. तेव्हा त्याच्याकडे तिची कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाहीत. अधिक चौकशीत ही मोटरसायकल हडपसरमधून चोरीला गेली असून हडपसर पोलीस ठाण्यात वाहन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ही माहिती मिळाली. पोलिसांनी सोनटक्के याला अटक केली असून मोटरसायकल जप्त केली आहे.

ही कामगिरी सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युवराज हांडे, सहायक पोलीस निरीक्षक शिंदे, पोलीस अंमलदार शहाजी काळे, प्रमोद टिळेकर व अमित कांबळे, स्वामी यांनी केली आहे.