PMC News | पुणे महापालिकेच्या विकासकामांची माहिती लवकरच घरबसल्या जाणून घेता येणार; जी.आय.एस. बेस्ड एंटेलिजन्स वर्क्स मॅनेजमेंट सिस्टिमचे काम अंतिम टप्प्यात

Pune PMC News | Pune Municipal Corporation: Prasad Katkar appointed as Election Department Chief, Avinash Sapkal as Income Tax Department Chief

पारदर्शक आणि गतीमान कामांसाठी महापालिकडून अत्याधुनिक प्रणाली विकसित – शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांची माहिती

पुणे : PMC News | विकास कामांमध्ये अधिकाअधिक पारदर्शकता आणून गतीने कामे मार्गी लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने इंटेलिजन्ट वर्क्स मॅनेजमेन्ट सिस्टिम (आय.डब्ल्यू.एम.एस) सुरू केली असून तिचा वापरही सुरू केला आहे. यामुळे एकाच ठिकाणी विविध विभागांची कामे करताना कामांचे नियोजन करणे, कामाचे डुप्लिकेशन रोखणे यासह डिफेक्ट लायबलिटी पिरियडमध्ये ठेकेदाराकडूनच दुरूस्ती करून घेणे यासारखी कामे एका क्लिकवर समजणार आहेत. त्याचवेळी अगदी कामाच्या एस्टीमेटपासून ते कामाचे बिल अदा करण्यापर्यंतची सर्व कामे पेपरलेस होणार आहे. पुढील महिन्याभरात नागरिकांना त्यांच्या परिसरात सुरू असलेल्या कामांची माहिती ऑनलाईन पाहाता येईल यासाठी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रणाली तयार करण्यात येईल, अशी माहिती शहर अभियंता प्रशांत वाघमारे (Prashant Waghmare) यांनी दिली. (GIS Based Intelligence Works Management System)

       प्रशांत वाघमारे यांनी सांगितले, की महापालिका मागील दोन वर्षांपासून आय.डब्ल्यू.एम.एस. या प्रणालीवर काम करत आहे. सीएसआरच्या माध्यमातून यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. या प्रणालीमध्ये अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार एस्टीमेट पासून बिल अदा करण्यापर्यंत सर्व कामे ऑनलाईन केली जाणार आहेत. २०२२-२३ पासून ही प्रणाली प्रायोगीक तत्वावर सुरू करण्यात आली असून सर्वच विभागातील अभियंत्यांना त्याचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. नुकतेच हे सॉफ्टवेअर जी.आय.एस. प्रणालीसोबत जोडण्याची प्रक्रिया अंतिम करण्यात आली असून चालू आर्थिक वर्षात ६ हजार १३१ कामांचे एस्टीमेट या प्रणालीतून करण्यात आले असून निविदा प्रक्रियानंतर ४ हजार २७० कामांच्या वर्क ऑर्डर देण्यात आल्या आहेत.

     या प्रणालीमुळे एखादे काम कधी झाले आहे, त्याचा डिफेक्ट लायबिलिटी पिरियड किती यापासून कामाच्या पुर्वीचे आणि काम झाल्यानंतरचे छायाचित्रही एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. प्रत्येक विभागाला दुसर्‍या विभागाची कामे, अंदाजपत्रकीय तरतूद या प्रणालीद्वारे समजणार असल्याने कामाचे आणि वेळेचे नियोजन करणे शक्य होणार आहे. सध्या सुरू असलेला फाईलींचा प्रवास ऑनलाईन होणार असून वेळेची बचत होणार आहे. ही प्रणाली सॅप सिस्टिमद्वारे ऑडीट विभागाशी जोडण्यात आल्याने बिल देखिल विनाविलंब मिळण्यास मदत होणार असल्याचे वाघमारे यांनी नमूद केले. महापालिकेच्या अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार सुरू असलेल्या कामांची माहिती नागरिकांना देखिल ऑनलाईन पाहाता यावी यासाठी प्रणाली विकसित करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिलेल्या सूचनांनुसार ही प्रणाली पुढील महिन्याभरात तयार करून नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.

ठळक बाबी

  • जी.आय.एस. बेस्ड आय.डब्ल्यू.एम.एस. प्रणालीमध्ये अंदाजपत्रकातील तरतुदीपासून प्रत्येक कामाचे एस्टीमेट,निविदा, वर्क ऑर्डर, कामांची मोजमापे, बिल तयार होणार असून हे काम ‘पेपरलेस’ असेल.
  • दुबार कामे रोखण्यासोबतच कामांतील गती आणि प्रगतीदेखिल या प्रणालीतील बारचार्टमुळे लक्षात येण्यास मदत होणार आहे.
  • पारदर्शक प्रणालीमुळे चुकीच्या कामांना लगाम बसणार.
  • नागरिकांना देखिल बसल्याठिकाणी कामांची माहिती मिळणार.
  • येत्या काळात काम सुरू असलेल्या ठिकाणी बारकोड उपलब्ध करून देण्यात येणार असून तो स्कॅन केला तरी नागरिकांना कामाची संपुर्ण माहिती मिळेल.
  • प्रत्यक्ष काम करत असताना येणार्‍या अडचणी व गरजा लक्षात घेउन ही प्रणाली अधिक पारदर्शी करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील.