Uttam Nagar Pune Crime News | परस्पर रिक्षाचे हप्ते भरणार्या पत्नीला पतीने केली मारहाण; डोक्यात लाटणे मारुन केले जखमी

पुणे : Uttam Nagar Pune Crime News | संसाराला हातभार लावण्यासाठी महिला काही तरी काम करुन पैसे कमवितात. अडीनडीला आपल्याकडील पैसे वापरतात. पण इथ रिक्षाचा हप्ता आपल्याला न सांगता भरल्याने चिडलेल्या पतीने पत्नीला मारहाण करुन जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Husband Beat Wife)
याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी (Uttam Nagar Police) इम्तीयाज नजीर कुरेशी (वय ३६, रा. ऋतुगंध सोसायटी, उत्तमनगर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या पत्नीे उत्तमनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार उत्तमनगरमधील ऋतुगंध सोसायटीत ३० नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची सासु या नोकरी करतात. त्यांनी रिक्षा घेतली असून त्यांचा मुलगा त्यावर इम्तीयाज कुरेशी हा रिक्षाचालक म्हणून काम करतो. इम्तीयाज याला दारुचे व्यसन आहे. त्यामुळे तो कधी रिक्षावर जातो, कधी नाही. घरात पैसे ठेवले तर तो घेऊन जाऊन त्याची दारु पितो. फिर्यादी व त्यांची सासु यांच्याकडे पैसे जमले होते. घरात पैसे ठेवले तर इम्तीयाज हा ते दारु पिण्यात घालवेल, असे वाटल्याने त्यांनी त्याला न सांगता रिक्षाचा हप्ता भरुन टाकला. पत्नीने रिक्षाचा हप्ता आपल्याला न सांगता भरल्याचे समजल्यावर इम्तीयाज कुरेशी याला राग आला. त्या रागातून त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ करुन पोटात लाथ मारुन खाली पाडले. घरातील लाटण्याने त्यांच्या डोक्यात मारुन जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक दिपाली लुगडे तपास करीत आहेत.