Pune Pimpri Chinchwad Crime News | ऑडी कारच्या बॉनेटवर तरुणाला नेले 4 किलोमीटर फरफटत; आकुर्डी ते चिंचवडमधील बिजलीनगरमधील घटना, तिघांना अटक (Video)

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | मोटारसायकलवरुन जाताना कारचा धक्का लागल्याने झालेल्या वादात ऑडी कारचालकाने (Audi Car Driver) तरुणाच्या अंगावर गाडी घातली. बॉनेटवर पडलेल्या तरुणाला तब्बल चार किलोमीटर फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी निगडी पोलिसांनी (Nigdi Police) तिघांना अटक केली आहे.
यााबत जेकेरिया जेकब मैय्थू (वय २३, रा. आण्णाभाऊ साठेनगर वसाहत, भक्ती शक्ती चौक, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी कारचालक कमलेश ऊर्फ अशोक पाटील Kamlesh alias Ashok Patil (वय २३, रा. बिजलीनगर, चिंचवड), हेमंत चंद्रकांत म्हाळसकर ऊर्फ सोन्या Hemant Chandrakant Mhalaskar alias Sonya (वय २६, रा. म्हाळसकरवाडी, तळेगाव दाभाडे), प्रथमेश पुष्कर दराडे Prathamesh Pushkar Darade (वय २२, रा. वाल्हेकरवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार आकुर्डीतील के टी एम शोरुम ते चिंचवडमधील बिजलीनगर (Bijlinagar Chinchwad) दरम्यान रविवारी रात्री पावणेदहा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेकेरिया व त्यांचा मित्र हे मोटारसायकलवरुन जात होते. त्यावेळी त्यांच्या गाडीला पाठीमागून भरधाव आलेल्या पांढर्या रंगाचे कारने हँडलला धक्का दिला. तेव्हा त्यांनी कारचालकाला धक्का का दिला असे विचारले. तेव्हा कमलेश व त्याच्या साथीदारांनी संगनमत करुन फिर्यादी व त्यांचा मित्र अनिकेत यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. प्रथमेश तेथेच थांबला. कमलेश व हेमंत यांनी तुला आज जिवंत सोडत नाही, असे म्हणून जीवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या अंगावर कार घातली. त्यामुळे फिर्यादी गाडीचे बॉनेटवर पडले. तरी कमलेश याने कार तशीच भरधाव वेगाने चालवत आकुर्डी रेल्वे स्टेशन येथून संभाजी चौक, मंगल मेडिकल बिजलीनगर येथे आणली. तेथे कारमधील महिलेला उतरण्यासाठी त्यांनी कार थांबविली. ही संधी साधून फिर्यादी कारच्या बॉनेटवरुन खाली उतरले. त्यानंतर आरोपी पळून गेले. आरोपींने फिर्यादी जेकेरिया यांना जवळपास ४ किलोमीटर फरफटत नेले. त्यांनी बॉनेटला पकडून ठेवल्यामुळे ते सुदैवाने वाचले. पोलीस उपनिरीक्षक शिर्के तपास करीत आहेत.