Lok Janshakti Party | लोकजनशक्ती पार्टीचा स्थापना दिन साजरा

Lok Janshakti Party

पुणे : Lok Janshakti Party | लोकजनशक्ती पार्टी रामविलास या पक्षाचा २४ वा स्थापनादिन २८ नोव्हेंबर रोजी साधू वासवानी चौक येथील पक्ष कार्यालयात साजरा करण्यात आला.

पक्षाचे पुणे शहर-जिल्हाध्यक्ष संजय आल्हाट यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.पक्षाच्या शपथपत्राचे सामूहिक वाचन करण्यात आले.

प्रदेश सरचिटणीस अमर पुणेकर,पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस के.सी.पवार,कल्पना जावळे,लक्ष्मी जाधव,संतोष,कुसूम दहिरे,अमित दरेकर,राहुल उभे,योगिता साळवे,श्रीनाथ अडागळे, बंडू वाघमारे, रुपेश जाधव, प्रवीण बनसोडे,अशोक भोसले,राजेश साळवे, अख्तर शेख उपस्थित होते.महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. केंद्रीय मंत्री चिराग पासवान, प्रदेशाध्यक्ष शमीम हवा यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला.