Pune Pimpri Chinchwad Crime News | दिवाळखोरीस जबाबदार धरुन कुर्‍हाडीने वार करुन केला खून; व्यावसायिक कुर्‍हाड घेऊन पोलीस चौकीत हजर

Telangana Crime News | Bitterness in the relationship between husband and wife, constant arguments between the two; Love rekindled at the school get-together, 3 children were strangled to death to be with their lover

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | कंपनी दिवाळखोरीत गेली. त्याला जबाबदार धरुन एका व्यावसायिकाने त्याच्याकडे पूर्वी काम करणार्‍याच्या डोक्यात, खांद्यावर कुर्‍हाडीने वार करुन त्याचा खून केला. त्यानंतर रक्ताने माखलेली कुर्‍हाड घेऊन तो पोलीस चौकीत हजर झाला. (Murder Case)

महेश सुंदरदास मोटवाणी (वय ४६, रा. गेलार्ड चौक, पिंपरी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन रामचंद्र गोपीचंद मनवानी Ramchandra Gopichand Manwani (वय ४६, रा. गुरुकृपा निवास, गेलार्ड चौक, पिंपरी) याला अटक केली आहे. हा प्रकार फिर्यादीच्या घराते घरासमोर गेलार्ड चौक येथे मंगळवारी दुपारी पावणेबारा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामचंद्र मनवानी आणि महेश मोटवाणी या दोघांचे कुटुंब पिंपरी कॅम्पमधील गेलार्ड चौकात एकमेकांच्या शेजारी राहतात. राम मनवानी याची अ‍ॅल्युमिनियम फॉईलची फॅक्टरी होती. या फॅक्टरीमध्ये महेश मोटवाणी कामाला होते. महेश यांच्यामुळे फॅक्टरीमध्ये आर्थिक नुकसान होऊन ते दिवाळखोर झाले, असे रामचंद्र मनवानी यांचे म्हणणे आहे. त्यातून त्यांच्यामध्ये नेहमी वाद होत होते.

दरम्यान, महेश हे एका ऑनलाईन कंपनीसाठी फुड डिलिव्हरी बॉय म्हणून काम करु लागले. ते नेहमीप्रमाणे मंगळवारी दुपारी पावणेबारा वाजता फुड डिलिव्हरीच्या कामासाठी घराबाहेर पडले. त्यावेळी रामचंद्र मनवानी हा हातात कुर्‍हाड घेऊन थांबला होता. महेश हे घराबाहेर पडताच रामचंद्र याने महेश यांच्यावर कुर्‍हाडीने वार केले. महेश रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर ती कुर्‍हाड घेऊन तो पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल झाला. महेश मोटवाणी यांना वायएमसीमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यु झाला. पोलिसांनी रामचंद्र मनवानी याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक लोहार तपास करीत आहेत.