Pune Crime Branch News | खुनाचा प्रयत्न करुन पळून गेलेल्या गुंडाला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाकडून अटक

पुणे : Pune Crime Branch News | हडपसर येथे पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादात एकावर वार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न करुन पळून जाणार्‍या गुंडाला दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने २० तासाच्या आत पकडले. (Arrest In Attempt To Murder Case)

सौरभ इंगळे (रा. झेड कॉर्नर, श्रीकृष्ण सोसायटी, मांजरी रोड) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक गस्त घालत असताना पोलीस हवालदार दत्तात्रय खरपुडे व गणेश गोसावी यांना सोमवारी रात्री खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल हडपसर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील आरोपी मांजरी रोड येथे थांबला असल्याची बातमी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन सौरव इंगळे याला पकडले. चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली असून पुढील कारवाईसाठी त्याला हडपसर पोलिसांच्या (Hadapsar Police) ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दत्तात्रय खरपुडे, गणेश गोसावी, सुनील महाडिक, सुदेश सकपाळ यांनी केली आहे.