Mundhwa Pune Crime News | 60 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलींवर केला लैंगिक अत्याचार ! शेजारी राहणार्यानेच केला विश्वासघात, चार महिने करत होता अत्याचार

पुणे : Mundhwa Pune Crime News | चॉकलेट खायला देण्याचे आमिष दाखवून शेजारी राहणार्या एका ६० वर्षाच्या नराधमाने दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी (Mundhwa Police) ६० वर्षाच्या नराधमाला अटक केली आहे. या बाबत मुलींच्या आईने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या दोघीही मुली घराबाहेर खेळत असताना शेजारी राहणार्या ६० वर्षाच्या नराधमाने त्यांना चॉकलेट खायला देण्याचे आमिष दाखवून आपल्या घरी नेऊन वेळोवेळी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस उपायुक्त आर राजा (DCP R Raja) यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी त्या नराधमाला अटक केली असून मुंढवा पोलीस तपास करीत आहेत.