Hadapsar Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून धारदार हत्याराने वार करुन 5 जणांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

पुणे : Hadapsar Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून टोळक्याने पाच तरुणांवर धारदार शस्त्राने वार करुन त्यांना जीवे ठार मारण्याचा (Attempt To Murder) प्रयत्न केला. याबाबत करण मुकेश मेमजादे (वय २३, रा. गोडबोले वस्ती, कमल कॉलनी, मांजरी, ता. हवेली) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे.
त्यावरुन पोलिसांनी प्रेम निलेश साठे (वय १९, रा. गुरुकृपा सोसायटी, भोसले निवास, केशवनगर, मुंढवा), सौरभ आण्णा इंगळे (वय २३, रा. झेड कॉर्नर, मांजरी), स्वप्नील सयाजी कठोरे (वय २३, रा. गुरुकृपा सोसायटी, मुंढवा), सुमित सुजीत बर्नवाल (वय १९, रा. गुरुकृपा सोसायटी, केशवनगर, मुंढवा), प्रतिक योगेश चोरडे (वय २१, रा. हरीओम कॉलनी, केशवनगर, मुंढवा) यांना अटक करण्यात आली असून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. हा प्रकार मांजरीतील मॉल झेड कॉर्नर येथे रविवारी रात्री साडेदहा वाजता घडला.
या घटनेत करण मेमजादे, सुजल भिसे, सुरज चौधरी, प्रतिक संजय शिंदे, तेजस ऊर्फ सोन्या पायगुडे हे जखमी झाले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्याचे मित्र पबजी गेम खेळत होते. यावेळी जुन्या वादाचा राग मनात धरुन आरोपी तेथे आले. त्यांनी फिर्यादी यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करुन हाताने तसेच धारदार हत्याराने मारहाण केली. फिर्यादीचे मित्र सुजल भिसे, सुरज चौधरी, प्रतिक संजय शिंदे, रस्त्यावर उभा असणारा तेजस ऊर्फ सोन्या पायगुडे यांना मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच सार्वजनिक रस्त्यावर हातातील हत्यारे हवेत फिरवून दहशत निर्माण केली. पोलिसांनी ६ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन पाच जणांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक उमेश रोकडे तपास करीत आहेत.