Sunil Shelke News | ‘अजितदादांना तोंडघशी पाडलं अन्…’, सुनील शेळकेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ‘शरद पवारांच्या संमतीनेच आम्ही सरकारमध्ये…’

मुंबई : Sunil Shelke News | मावळ विधानसभा मतदारसंघात (Maval Assembly) मावळ पॅटर्न अपयशी ठरला. या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) उमेदवार सुनील शेळके लाखांहून अधिकचे मताधिक्य घेत विजयी झाले. दरम्यान आता सुनील शेळके यांनी केलेले विधान चर्चेत आले आहे. “शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रीय नेतृत्वापुढे अजित पवारांना एकदा नाही तर तीन वेळा तोंडघशी पाडलं”, असे म्हणत शेळकेंनी मोठ्या घडामोडीवर भाष्य केले आहे.
सुनील शेळके म्हणाले, “शरद पवारांच्या संमतीनेच आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो होतो. ज्यावेळी बैठका सुरु होत्या. त्यावेळी मंत्रिपद देखील फायनल झाले होते. मात्र, त्यांनी अजित पवारांना तोंडघशी पाडलं. असं तीन वेळा केंद्रीय नेतृत्वापुढे तोंडघशी पाडलं, मग आम्ही अजित पवारांना सांगितलं तुम्ही निर्णय घ्या. आम्ही पाठिंबा देतो आणि त्यामुळे आम्ही सहभागी झालो. आता देखील साहेबांचा आम्हाला पाठिंबा होता. त्यामुळे तर प्रफुल पटेल, दिलीप वळसे-पाटील, भुजबळ सोबत आले”, असा गौप्यस्फोट शेळके यांनी केला आहे.