Pune Police News | पुणे शहर पोलीस व सेवा मित्र मंडळ ट्रस्ट यांच्याकडून २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शाहिदांना श्रध्दांजली अर्पण

Tribute to the Martyrs

पुणे : Pune Police News | २६/११/२०२४ रोजी सकाळी ०८/३० वा चे दरम्यान स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत सारसबाग या ठिकाणी पुणे शहर पोलीस दल व सेवा मित्र मंडळ ट्रस्ट (Seva Mitra Mandal Trust) यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक २६/११/२००८ रोजी शहिद झालेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली व शहिदांच्या स्मरणार्थ शालेय मुलांकरीता चित्रकला व खाऊ वाटपाचा कार्यक्रम सारसबाग स्वारगेट पुणे (Sarasbaug Swargate Pune) येथे आयोजित करण्यात आला होता.

सदर वेळी २६/११ हल्यातील शहिद जवानांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त संदिपसिंह गिल, पोलीस उप आयुक्त स्मार्तना पाटील, पोलीस उप आयुक्त आर. राजा, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे शाखा) निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त (स्वारगेट विभाग) राहुल आवारे, स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे तसेच कसबा पेठ विधानसभा मतदार संघ पुणेचे आमदार हेमंत रासने, सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षक चंद्रशेखर दैठणकर यांचेसह पोलीस आयुक्तलातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी शहिदांना मानवंदना देऊन सलामी दिली. यावेळी सेवा मित्र मंडळ पुणे अध्यक्ष शिरीष मोहिते, राजाभाऊ कदम व पदाधिकारी त्याचप्रमाणे पुणे शहरातील इतर मान्यवर उपस्थित होते.