Pune Crime Branch News | तडीपार गुन्हेगाराला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने केले जेरबंद

tadipar

पुणे : Pune Crime Branch News | तडीपार केले असतानाही पुणे शहरात प्रवेश करुन घरी आलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केली आहे. (Tadipar Criminal Arrested)

गौरव संभाजी काकडे Gaurav Sambhaji Kakade (वय ३२, रा. सोमेश्वरवाडी, पाषाण) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव (Himmat Jadhav DCP) यांनी गौरव काकडे याला मार्चमध्ये तडीपार केले होते.

दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार अमित गद्रे यांना तडीपार केलेला गौरव काकडे हा राहते घरी येणार आहे,अशी बातमी मिळाली. या बातमीची खातरजमा करण्यासाठी पोलीस पथकाने त्याच्या पाषाण येथील घराजवळ सापळा रचला. घरी आलेल्या गौरव काकडे याला ताब्यात घेण्यात आले. कोणतीही पूर्वपरवानगी न घेता तडीपारीचा भंग केल्याबद्दल त्याच्याविरुद्ध चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे, दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलीस उपनिरीक्षक शाहीद शेख, गणेश ढगे, प्रदीप राठोड, अजित शिंदे, महेश पाटील, साईकुमार कारके, अमित गद्रे यांनी केली आहे.