Eknath Shinde | मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदेंनी मोदी- शहांकडे कळवला निर्णय; म्हणाले,…

मुंबई: Eknath Shinde | राज्याच्या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election Results 2024) महायुतीला (Mahayuti) मोठे यश मिळाले. दरम्यान आता मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? यावरून रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र आहे. दरम्यान मोदी- शहा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असल्याचे एकनाथ शिंदे यांनी वरिष्ठांना स्पष्टपणे कळविल्याची माहिती शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी दिली आहे. (Who Will Next CM Of Maharashtra)

माध्यमांशी बोलताना दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले, ” मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे अजिबात नाराज नाहीत. वरिष्ठ नेते घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत मोदी (PM Narendra Modi) व शहा (Amit Shah) घेतील तो निर्णय सर्वांनाच मान्य असेल. आपला नेता मुख्यमंत्री व्हावा अशी भावना प्रत्येक कार्यकर्त्याची असते. मात्र तिन्ही पक्षांनी सांगितले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल.”

ते पुढे म्हणाले, “येत्या काही दिवसात नवं सरकार स्थापन होईल. उद्या भाजपा आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. त्या बैठकीत भाजपाच्या गटनेत्याची निवड होईल. त्यानंतर तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून चर्चा करतील आणि पक्षश्रेष्ठींकडे जातील. त्याठिकाणी जो निर्णय होईल तो आम्हा सर्वांना मान्य असेल”, असे माजी मंत्री दीपक केसरकर यांनी म्हंटले आहे.