Atulchandra Kulkarni | ‘हे एक नवे आव्हान आहे’ – अतुलचंद्र कुलकर्णी

निवृत्त आयपीएस अधिकारी अतुलचंद्र कुलकणी यांची मॅट सदस्यपदी निवड
पुणे : Atulchandra Kulkarni | पोलीस सेवेत असताना इतकी वर्षे वेगवेगळ्या आव्हानांशी यशस्वीपणे सामना केला. आता, निवृत्तीनंतर आता एक नवे आव्हान मिळाले आहे. प्रशासकीय कामकाजात एक जज्ज म्हणून काम करायचे आहे. हे वेगळे जग आहे, असे मत निवृत्त आयपीएस अधिकारी अतुलचंद्र कुलकर्णी यांनी ‘पोलीसनामा’ शी बोलताना व्यक्त केले. (Maharashtra Administrative Tribunal-MAT Court)
निवृत्त आयपीएस अधिकारी अतुलचंद्र कुलकर्णी यांची केंद्र सरकारने महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाच्या (मॅट) मुंबई बँचच्या सदस्यपदी नियुक्ती केली आहे. त्याबद्दल ते बोलत होते.
अतुलचंद्र कुलकर्णी हे राष्ट्रीय तपास संस्थेतून जानेवारीमध्ये निवृत्त झाले होते. अतुलचंद्र कुलकर्णी हे मुळचे माढा येथील राहणारे असून ते १९९० मध्ये भारतीय पोलीस सेवेत भरती झाले. त्यांनी नांदेड, जालना, जळगाव, बुलढाणा, मुंबई, भंडारा, नागपूर येथे विविध पदावर काम केले होते. केंद्रीय गुप्तचर विभागात (आयबी) ११ वर्षे सेवा दिली आहे.
त्यांनी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी), कारागृह अतिरिक्त पोलीस महासंचालक, दहशतवाद विरोधी पथक येथे काम पाहिले आहे. एटीएसमध्ये असताना त्यांच्या नेतृत्वाखाली १२८ तरुणाचे मनपरिवर्तन करुन त्यांना मुख्य प्रवाहात आणले होते. आता मॅटमध्ये काम करताना ते शासकीय अधिकारी व कर्मचार्यांना न्याय देण्याचे काम करणार आहे.