Shivsena Shinde Group News | शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ‘शिवसेना ठाकरे गटाचे ५ आमदार संपर्कात, 2-3 वगळता सर्व आमच्याकडे येणार’

Uday-Samant-2

मुंबई : Shivsena Shinde Group News | राज्यात विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election Results 2024) निकाल लागला आहे. या निकालात महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळालं आहे. राज्यात सत्ताबदल होईल, असा दावा विरोधक करत होते. मात्र हा अंदाज साफ फोल ठरला. महायुतीच्या तिन्ही पक्षांना मिळून ५० जागांचाही आकडा गाठता आलेला नाही. दुसरीकडे एकट्या भाजपाने (BJP) तब्बल १३२ जागांवर बाजी मारली आहे. शिंदे गटाने (Shivsena Shinde Group) ५७ तर अजित पवार गटाने (Ajit Pawar NCP) ४१ जागा मिळवल्या आहेत.

दरम्यान आता संभाव्य मंत्रिमंडळाची चर्चा होत असतानाच आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार उदय सामंत (Uday Samant) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group) आमदार आमच्या संपर्कात असल्याचे सामंत यांनी म्हंटले आहे.

” शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पाच आमदार आमच्या संपर्कात आहेत. यावेळी दोन-तीन सोडता सर्व आमदार आमच्याकडे येतील. रात्रीपासून हे आमदार आमच्या संपर्कात आहेत”, असे उदय सामंत यांनी म्हंटले आहे. उद्धव ठाकरे गटाचे कोणते आमदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.