Pune Pimpri Chinchwad Crime News | प्रेमसंबधांतून तरुणाच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न; बहिणीच्या प्रियकराचा खुनाचा प्रयत्न

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | बहिणीबरोबर असलेले प्रेमसंबंध पसंत नसल्याने भावाने तरुणाला बोलावून घेऊन त्याच्या डोक्यात दगड घालून खुनाचा प्रयत्न केला (Attempt To Murder). या घटनेत राम गोरखनाथ पेंडलवाड (वय २४, रा. यमुना कॉलनी, लांडगे वस्ती, भोसरी) हा गंभीर जखमी झाला आहे.

या प्रकरणी राम याच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी शुभम संभाजी पांचाळ (वय २०, रा. भोसरी) याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना भोसरीतील यमुना कॉलनीत शनिवारी मध्यरात्री बारा वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम पेंडलवाल आणि शुभम पांचाळ हे मित्र आहेत. राम याचे शुभम याच्या बहिणीबरोबर प्रेमसंबंध आहेत. ते शुभम याला माहिती झाल्याने शुभम याने राम याला फोन करुन घराबाहेर बोलावले. त्याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यात दगड मारुन गंभीर जखमी केले आहे. त्यानंतर तो मित्रासह पळून गेला. पोलीस उपनिरीक्षक गुरव तपास करीत आहेत.