Mahayuti News | महायुतीच्या नेत्यांना आणखी एक लॉटरी, विधानपरिषदेच्या 6 जागा रिक्त

मुंबई : Mahayuti News | राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांपैकी महायुतीने २३४ जागा मिळवून नवा विक्रम रचला आहे. यामध्ये भाजपला (BJP) १३२, शिंदे गट (Shivsena Shinde Group) ५७ तर अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पक्षाला ४१ जागांवर विजय मिळाला आहे. महायुतीच्या या यशानंतर आता आणखी एक लॉटरी महायुतीला लागली आहे. (Maharashtra Politics)
महायुतीला विधान परिषदेमध्ये ६ आमदार म्हणून पाठवता येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभेच्या निकालानंतर विधानपरिषदेच्या एकूण ६ जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे आता ज्या नेत्यांचे तिकीट नाकारण्यात आले होते त्यांना विधान परिषदेवर संधी देता येणार आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये विधान परिषदेतील भाजपचे चार आमदार निवडून आले आहेत. सध्या विधानपरिषदेवर आमदार असलेले चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar), रमेश कराड (Ramesh Karad) आणि प्रविण दटके (Pravin Datke) हे भाजपाचे चार नेते विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यामुळे विधानपरिषदेत (Vidhan Parishad) भाजपच्या चार जागा रिक्त झाल्या आहेत.
त्याचबरोबर शिवसेनेच्या नेत्या आमश्या पाडवी (Amshya Padvi) आणि अजित पवार गटाचे नेते राजेश विटेकर (Rajesh Vitekar) यांचा देखील विधानसभेवर विजय झाला आहे. त्यामुळे या दोन जागाही रिक्त झाल्या आहेत. दरम्यान जागावाटपात नाराज झालेल्या नेत्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात येऊ शकते.