Vadgaon Sheri Assembly | बापूसाहेब पठारे विजयी, विद्यमान आमदार सुनिल टिंगरे यांचा वडगाव शेरीत पराभव

पुणे : Vadgaon Sheri Assembly | वडगाव शेरीत महायुतीला (Mahayuti) धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला आहे. अगदी १९ व्या फेरीअखेर सुनिल टिंगरे (Sunil Tingre) हे आघाडीवर असताना शेवटच्या तीन फेरीमध्ये बापूसाहेब पठारे (Bapu Pathare) यांनी आघाडी घेत सुनिल टिंगरे यांचा जवळपास 4 हजार 500 मतांनी पराभव केला आहे.
१५ व्या फेरीअखेर सुनिल टिंगरे हे ११४७३ मतांनी पुढे होते, त्यानंतर त्यांचे मताधिक्य कमी होत गेले. २० व्या फेरीअखेर टिंगरे यांना ११५४०० मते मिळाली होती. त्यावेळी बापूसाहेब पठारे यांना ११४६१४ मते मिळाली. टिंगरे यांना केवळ ७८६ मतांची आघाडी होती. त्यानंतर शेवटच्या तीन फेर्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (Sharad Pawar NCP) बापूसाहेब पठारे यांनी आघाडी घेत विजय मिळविला आहे.