Sunil Shelke News | मावळचे आमदार सुनील शेळके यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता

मावळ : Sunil Shelke News | लाखांचे मताधिक्याने दिग्विजय केलेले मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांनी दुसऱ्यांदा लाखाच्या फरकाने निवडणूक जिंकून महाराष्ट्रामध्ये विक्रम तयार केलेला आहे. मावळच्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलं होतं अशी लक्षवेधी लढत मावळमध्ये पाहायला मिळाली. सुनील शेळके यांच्या कार्याचा आणि कामाचा झपाटा पाहता त्यांचा विजय निश्चित होताच. पण एकंदर एका बाजूला सर्वपक्षीय उमेदवार आणि महायुतीतले सुद्धा काही घटक हे विरोधात एकवटल्यामुळे एक चूरस निर्माण झाली होती.
तरीही प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करून सुनील शेळके यांनी जो विजय खेचून आणला आणि तोही थोडा थोडा नव्हे तर लाखाचे मताधिक्य मिळवून यामुळे महाराष्ट्राच्या आगामी मंत्रिमंडळामध्ये सुनील आण्णा शेळके यांचा मंत्रिमंडळात समावेश व्हावा अशी मावळवासीयांची इच्छा आहे. आणि ती देखील निश्चितच पूर्ण होईल कारण महायुती हे महाविजय घेऊन सत्तेत येत आहे. त्यामुळे एकंदरच मावळ तालुक्यात जल्लोषाचे वातावरण आहे मावळला आता फक्त आमदार नाही तर मंत्री मिळणार असा विश्वास राजकीय तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. या विजयामध्ये महायुतीच्या आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर विश्वास ठेवून अखंडपणे साथ दिलेले संतोष भेगडे यांची मोलाची साथ ठरली आणि त्यातच हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती दाभाडे सरकार यांनी हिम्मत दिली जो विश्वास दिला त्यामुळे हा विजय सोपा झाला. एक प्रकारे या लढतीला छत्रपतींचा आशीर्वाद प्राप्त झाला. मावळच्या माता भगिनींचा अभूतपूर्व उत्साह आणि भावाला दिलेली बहीणींची साथ ही यशाची नांदी ठरली. सुनील आण्णा शेळके यांचे उत्कृष्ट नियोजनात एकीकडे ते स्वतः संपूर्ण मावळ तालुका पिंजून काढत असताना त्यांचे इतर सहकारी अनेक बुरुज लढवत होते अनेक आघाड्यांवर सातत्याने काम करत होते आणि असा हा एकंदर अभूतपूर्व अशा प्रकारचा लढा सुनील आण्णा शेळके यांनी विजयाची उद्घोषणा करत जिंकलेला आहे आणि म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्राचा लक्ष लागून राहिलेले या मतदारसंघांमधील आमदार हे मंत्री झाल्यास मावळ वासियांना आनंद होईल. नक्कीच अजितदादा पवार मावळचा हा आनंद मंत्रिपद देऊन द्विगुणीत करतील यात शंका नाही.