Shivaji Nagar Assembly Election Results 2024 | शिवाजीनगर मतदारसंघात भाजपचा दबदबा कायम, सिद्धार्थ शिरोळे सलग दुसऱ्यांदा आमदार

पुणे : Shivaji Nagar Assembly Election Results 2024 | शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून दत्ता बहिरट (Datta Bahirat), भाजपकडून सिद्धार्थ शिरोळे, अपक्ष उमेदवार मनीष आनंद (Manish Anand) निवडणुकीच्या रिंगणात होते. दरम्यान या मतदारसंघात भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे (Siddharth Shirole) यांनी काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांचा ३६,७०२ मतांच्या फरकाने पराभव करत मोठा विजय मिळवला आहे.
शिरोळे यांनी ८४,६९५ मते मिळवत मतदारांचा विश्वास पुन्हा एकदा जिंकला असून ते सलग दुसऱ्यांदा येथून आमदार झाले आहेत. दत्ता बहिरट यांनी मतदारसंघात जोरदार प्रचार केला होता. मात्र शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पक्ष संघटनेची ताकद मतदारसंघात वर्चस्व राखणारी ठरली. शिरोळे यांच्या सलगच्या दुसऱ्या विजयाने पक्षाचा गड अधिक मजबूत झाला आहे.
अपक्ष उमेदवार मनीष आनंद यांनी १३,०६१ मते मिळवली. काँग्रेस आणि भाजप या मुख्य लढतीत पक्षातील बंडखोरीमुळे मतविभाजनाचा झालेला फटका काँग्रेसला बसला.
२० फेऱ्यांनंतर शिवाजीनगरची अंतिम आकडेवारी
सिद्धार्थ शिरोळे (भाजप): ८४,६९५ मते (+३६,७०२)
दत्ता बहिरट (काँग्रेस): ४७,९९३ मते
मनीष आनंद (काँग्रेस बंडखोर): १३,०६१ मते