Parvati Assembly Election Results 2024 | पर्वती मतदारसंघात भाजपचे निर्विवाद वर्चस्व, सलग चौथ्यांदा माधुरी मिसाळ बनल्या आमदार

Madhuri Misal

पुणे : Parvati Assembly Election Results 2024 | पर्वती विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळाली. भाजपकडून माधुरी मिसाळ, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अश्विनी कदम (Ashwini Kadam) तर अपक्ष म्ह्णून आबा बागुल (Aba Bagul) निवडणुकीच्या रिंगणात होते. या मतदारसंघात भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळविले असून, भाजपच्या माधुरी मिसाळ (Madhuri Misal) या येथून सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.

मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून मिसाळ यांनी आघाडी घेतली. ही आघाडी कायम राखत २० व्या फेरीअखेर त्या ५० हजारांहून अधिक मतांनी विजयी झाल्या. त्यांना १ लाख १७ हजार ८८७ मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी अश्विनी कदम यांना ६७ हजार ३७३ मते मिळाली.

काँग्रेस बंडखोर उमेदवार आबा बागुल यांना १० हजार ४४६ मते मिळाली. विशेष म्हणजे, यंदा एकूण तीन अश्विनी कदम मैदानात होत्या. त्यातील पहिल्या अपक्ष अश्विनी अनिल कदम आणि दुसऱ्या अपक्ष अश्विनी नितीन कदम चार आकडी मतसंख्या ही गाठता आली नाही.