Khadakwasala Assembly Election Results 2024 | खडकवासला मतदारसंघात भाजपचे भीमराव तापकीर 50 हजारांच्या मताधिक्याने विजयी (Video)

Bhimrao Tapkir (3)

पुणे : Khadakwasala Assembly Election Results 2024 | खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपकडून भीमराव तापकीर (Bhimrao Tapkir), राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून (Sharad Pawar NCP) सचिन दोडके (Sachin Dodke), तर मनसेकडून (MNS) मयुरेश वांजळे (Mayuresh Wanjale) निवडणुकीच्या रिंगणात होते. दरम्यान भाजपच्या भीमराव तापकीर यांनी आपला दबदबा कायम ठेवत शरद पवार गटाच्या सचिन दोडके यांचा ५२,३२२ मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला आहे.

दिवंगत मनसे नेते रमेश वांजळे यांचे पुत्र मयूरेश वांजळे हे मनसेच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, मात्र वडिलांप्रमाणे त्यांना खडकवासल्यात विजयी कामगिरी करता आली नाही. मत मोजणीच्या फेऱ्यांसह तापकीर यांची आघाडी वाढत गेल्याने अखेर विरोधकांना पराभव स्वीकारावा लागला.

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून येथे जोरदार प्रचार करण्यात आला होता, मनसेच्या मयुरेश वांजळे यांनी देखील मतदारांना साद घातली होती. मात्र, भाजप पक्ष संघटनेची ताकद आणि तापकीर यांच्या स्थानिक प्रभावामुळे अखेर विजय त्यांच्याच पारड्यात पडला.

२५ फेऱ्यांतील मतमोजणीनंतर अंतिम मते

भीमराव तापकीर (भाजप): १,६३,१३१ मते

सचिन दोडके (राष्ट्रवादी – शरद पवार गट): १,१०,८०९ मते

मयूरेश वांजळे (मनसे): ४२,८९७ मते