Wagholi Pune Crime News | अल्पवयीन मुलाकडून 14 वर्षाची मुलगी गर्भवती; वाघोली परिसरातील घटना, शेजारी शेजारी राहणारे

पुणे : Wagholi Pune Crime News | दोघेही अल्पवयीन, शेजारी शेजारी राहणारे, एकमेकांशी शारीरीक जवळीक वाढली. शरीरसंबंध झाले. त्यातून १४ वर्षाची मुलगी गर्भवती राहिल्याचा प्रकार समोर आला आहे. (Minor Girl Rape Case)
याबाबत पिडित मुलीच्या आईने वाघोली पोलीस ठाण्यात (Wagholi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन शेजारी राहणार्या अल्पवयीन मुलावर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २० ऑगस्ट २०२४ पासून गेल्या तीन महिन्यापासून सुरु होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा आणि पिडित १४ वर्षाची मुलगी हे शेजारी शेजारी राहतात. शेजारी रहात असल्याने ते एकमेकांच्या परिचयाचे होते. वाढत्या वयात त्यांच्यात एकमेकांविषयी शारीरीक आकर्षण निर्माण झाले. त्यातून त्यांच्यात फिर्यादीच्या घरी त्यांच्यात शरीरसंबंध आले. त्यातून ही मुलगी गर्भवती राहिली. मुलीच्या आईच्या लक्षात हा प्रकार आला तोपर्यंत मुलगी अडीच महिन्याची गर्भवती राहिली होती. सहायक पोलीस निरीक्षक अहिरे तपास करीत आहेत.