Maharashtra Assembly Election 2024 | सट्टा बाजारातही महायुती फेवरेट

पुणे : Maharashtra Assembly Election 2024 | मतदान पूर्ण झाल्यानंतर बुधवारी सायंकाळी विविध एक्झिट पोलमध्ये अनेकांनी महायुतीला अधिक जागा दिल्या होत्या. महायुती बहुमत मिळवेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तसाच कल सट्टा बाजारातही दिसून येत आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक निकालावर हजारो कोटींचा देशभरातील सट्टा बाजारात लावण्यात आला आहे. सट्टाबाजांनी महायुतीला फेवरेट म्हटले आहे. देशभरात राजकोट आणि इंदौर बाजार प्रसिद्ध आहे. तेथे महायुतीसाठी ४० पैसे देण्यात येत आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीला २ रुपये भाव दिला जात आहे. सट्टाबाजांच्या मतानुसार महायुतीला १४२ ते १५८ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीला १२० ते १२८ जागा मिळतील, असे म्हटले जात आहे.