Maharashtra Assembly Election 2024 | अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांना गळाला लावण्याचे मोठे आव्हान, भाजपकडून ‘या’ सहा नेत्यांवर जबाबदारी

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | राज्यात (दि.२०) नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडली असून (दि.२३) नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. विधानसभेच्या निकालापूर्वी महायुती आणि महाविकास आघाडीकडून (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
त्यातच आता भाजपने अपक्ष आणि बंडखोरांना गळाला लावण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. भाजपकडून सहा नेत्यांवर ही जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये मंत्री रवींद्र चव्हाण, भाजप नेते प्रवीण दरेकर, संजय कुटे, मोहित कंबोज, नितेश राणे आणि निरंजन डावखरे यांचा समावेश आहे.
उद्या (दि.२३) सकाळी ८ वाजता राज्यातील सर्व मतदारसंघांमध्ये मतमोजणीला सुरुवात होईल. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या गोटात हालचालींना प्रचंड वेग आला आहे. अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांना गळाला लावण्याचे मोठे आव्हान महाविकास आघाडी आणि महायुती समोर असणार आहे.