BJP Leader Sachin Shinde Join Shivsena UBT | निकालाच्या एक दिवस आधीच उद्धव ठाकरेंकडून भाजपला धक्का, राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई : BJP Leader Sachin Shinde Join Shivsena UBT | विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या (दि.२३) जाहीर होणार आहे. दरम्यान आता महायुतीचे की मविआचे पारडे जड असणार? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक लक्ष लागलेल्या माहिम विधानसभा मतदारसंघातून (Mahim Vidhan Sabha) एक मोठी घडामोड समोर आली आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
भाजपचे माहिम विधानसभेचे उपाध्यक्ष सचिन शिंदे यांनी आज (दि.२२) शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
माहिममध्ये शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे तीन पक्ष मैदानात उतरले होते. मनसेकडून अमित ठाकरे, शिंदेंच्या शिवसेनेकडून सदा सरवणकर निवडणुकीसाठी उमेदवार होते.
अशातच आता विधानसभा निकालाच्या एक दिवस आधी माहिम विधानसभा मतदार संघामध्ये ठाकरेंनी मोठी खेळी केली आहे. भाजपचे माहिम विधानसभेचे उपाध्यक्ष सचिन शिंदे यांनी आज मातोश्रीवर दाखल होत ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. या पक्ष प्रवेशामुळे माहीम मतदारसंघातील निकालाचे चित्र काय असणार याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.