Mundhwa Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून टोळक्याचा तिघांवर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; घोरपडी येथील बी टी कवडे रोडवरील पहाटेची घटना

पुणे : Mundhwa Pune Crime News | दुकानाबाहेर चौघे मित्र गप्पा मारत थांबले असताना पूर्ववैमनस्यातून एका टोळक्याने तिघांवर कोयत्याने वार (Koyta Attack) करुन त्यांना गंभीर जखमी केले (Attempt To Murder). मुंढवा पोलिसांनी (Mundhwa Police) चौघा जणांच्या टोळक्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एका २८ वर्षाच्या तरुणाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना घोरपडीतील बी टी कवडे रोडवरील (BT Kawade Road Pune) देवकी पॅलेस चौकातील स्वराज अमृततुल्य शेजारी गुरुवारी पहाटे २ वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे तीन मित्र हे पहाटेपर्यंत गप्पा मारत बसले होते. या टोळक्याबरोबर त्यांचे शाब्दिक वाद व बाचाबाची यापूर्वी झाली होती. या वादाचा राग मनात ठेवून तीन ते चार जण तेथे आले. त्यांनी अमित परदेशी याच्या डोक्यात व हनुवटीवर वार करुन गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादीस हाताने व उलट्या कोयत्याने मारहाण केली. सोहेश अलमले (रा. मांजरी) याच्या कानाजवळ धारदार हत्याराने वार करुन जखमी केले. अजय पवार याच्या डोक्यात मानेवर,पाठीमध्ये, पोटावर, दोन्ही पायावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तेथील स्वीफ्ट कारची मागील काच फोडून नुकसान करुन ते टोळके पळून गेले. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे (API Sandeep Jore) तपास करीत आहेत.