Dattanagar Pune Crime News | बॅचलर पार्टीत मित्राने डोक्यात फोडली बाटली ! मित्राच्या उपवर वधुचा केला विनयभंग, दत्तनगरमधील घटना

पुणे : Dattanagar Pune Crime News | विवाह ठरल्याने त्याने मित्राला पार्टीला बोलावले़ प्रेमाच्या त्रिकोणात त्याने दारुच्या नशेत मित्राची उपवर वधु हिचा हात धरला. त्याचा मित्राने जाब विचारल्यावर त्याने मित्राच्या डोक्यात दारुची बाटली फोडली. तर तरुणीने विनयभंगाची (Molestation Case) फिर्याद दिली आहे.
याबाबत रोहित महेंद्र पाटील (वय ३०, रा. भोसलेनगर, शिवाजीनगर) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आगम प्रसाद Aagam Prasad (वय ३०, रा. टेल्को कॉलनी, दत्तनगर) याच्याविरुद्ध दुखापत केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरी फिर्याद २६ वर्षाच्या मैत्रिणीने दिली आहे. ही घटना आरोपीच्या दत्तनगरमधील टेल्को कॉलनीतील घरी मंगळवारी पहाटे १ वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगम प्रसाद याचा विवाह ठरला आहे. त्याने आपला मित्र रोहित पाटील या घरी बोलावले. दोघे दारु पित बसले होते. काही वेळाने आरोपीने त्याच्या मैत्रिणीला फ्लॅटवर बोलावून घेतले. फिर्यादीचा मित्र त्याच्या बेडरुममध्ये झोपी गेल्यानंतर आरोपी हा फिर्यादीकडे वाकड्या नजरेने पाहु लागला. त्याने फिर्यादीचा उजवा हाथ धरुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यावरुन फिर्यादी आरोपीला खडसावून बोलत होती. त्यांचा आवाज ऐकून बेडरुममध्ये झोपलेला मित्र उठून बाहेर आला. त्याने आरोपीला जाब विचारताच त्याने दोघांना हाताने मारहाण केली. फिर्यादीचे गळ्यास ओरखडून चष्मा फोडला. त्यावेळी आरोपीने फिर्यादीच्या मित्राच्या डोक्यात दारुची बाटली फोडली. फुटलेली दारुची बाटली फिर्यादीच्या उजव्या हाताच्या पंज्यावर मारुन जखमी केले. त्यानंतर भाजी कापण्याच्या चाकूने त्याने मित्रावर वार करुन जखमी केले. तुमच्याकडे बघुन घेतो, अशी धमकी दिली. पोलीस हवालदार पी. डी. टापरे (P.D. Tapre) तपास करीत आहेत.