Shrinivas Pawar On Ajit Pawar | श्रीनिवास पवार यांचा अजित पवारांवर निशाणा; म्हणाले – ’87 वर्षाच्या आईचा वापर राजकारणासाठी होतो हे दुर्दैवी’

बारामती : Shrinivas Pawar On Ajit Pawar | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर बारामती विधानसभा मतदारसंघ (Baramati Assembly Election 2024) चांगलाच चर्चेत आहे. या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार (Yugendra Pawar) हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून (Sharad Pawar NCP) अजित पवारांविरोधात निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या निवडणुकीला वेगळे महत्व आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रचार सांगता सभेत त्यांची आई आशाताई (Ashatai Pawar) यांना आणण्यात आलं. त्यावरून आता श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. “माझी आई आता ८७ वर्षाची आहे. तिला सभेला आणणे कितपत योग्य होते, हे मला समजत नाही. तिथे वाचलेले पत्र तिनेच लिहिले असावे का याबद्दल मी साशंक आहे. कारण मी सुद्धा तिचाच मुलगा आहे”, असे मत श्रीनिवास पवार यांनी व्यक्त केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रचार सांगता सभेत आई आशाताई यांना आणण्यात आले. त्यांच्या वतीने पत्र वाचन करण्यात आले, यासंबंधी श्रीनिवास पवार म्हणाले, “आई सध्या ८७ वर्षाची आहे. तिचा राजकारणासाठी वापर होतो याचे मला वाईट वाटते. ती त्यांची आई आहे तशी माझीही आई आहे. आईनेच ते पत्र लिहिले का याबद्दल मला शंका आहे.
आम्हाला कधी २०-२५ वर्षात पत्र लिहिले नाही. ते तिने लिहिले असेल का?. तिच्या आजाराबाबत अजित पवार यांनी सभेत माहिती दिली. तिची ट्रीटमेंट सुरु आहे. ती थांबवून तिला ८ दिवसांसाठी इथे आणले गेले. ठिक आहे, तिला ते २५ तारखेनंतर पुन्हा ट्रिटमेंटसाठी नेतील.
मी तर अशा परिस्थितीत तिला असा आग्रह केला नसता. मी तिला भेटलो होतो तेव्हा ती मला म्हणाली की मी दमलीय रे, कंटाळली आहे या आजारपणाला. मला दोन पावले सुद्धा चालता येत नाहीत. तुला सभेला नेतील अशी विचारणाही मी केली होती, पण मी हलू शकणार नाही, असे ती म्हणाली होती. पण सोमवारच्या सभेत ती दिसल्याने मला आश्चर्य वाटले. साहजिकच या वयात व्यक्ती परावलंबी असतो, तुम्ही बाकीचे समजून घ्या”, असे श्रीनिवास पवार यांनी म्हंटले आहे.