Pune Police Bandobast News | बंदोबस्तासाठी शहर पोलिसांच्या दिमतीला CAPF, SRPF ! 10 हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त

पुणे : Pune Police Bandobast News | गेले २० दिवस सुरु असलेला प्रचार सोमवारी सायंकाळी संपला. त्यानंतर आता सर्व यंत्रणा मतदानाच्या तयारीला लागले आहेत. शहरात मतदान शांततेत व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता पार पाडले जावे, यासाठी शहर पोलीस दलाने मोठा बंदोबस्त लावला आहे. शहर पोलीस दलाच्या बरोबर केंद्रीय शस्त्र पोलीस दल (सीएपीएफ – Central Armed Police Forces -CAPFs), राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ – State Reserve Police Force – SRPF), शीघ्र कृती दल (क्यु आर टी – Quick response team (QRT) यांच्यासह होमगार्डची (Homeguard) दिमतीला देण्यात आले आहेत.
पुणे शहर पोलीस दलाच्या कार्यक्षेत्रात पुणे शहरातील कसबा (Kasba Peth Assembly), वडगाव शेरी (Vadgaon Sheri Assembly), शिवाजीनगर (Shivaji Nagar Assembly), कोथरुड (Kothrud Assembly), पर्वती (Parvati Assembly), कँट्रोंमेंट (Pune Cantonment Assembly), हडपसर (Hadapsar Assembly) या सात विधानसभा मतदार संघाचा संपूर्ण भाग तसेच खडकवासला (Khadakwasla Assembly), शिरुर (Shirur Assembly), पुरंदर (Purandar Assembly), भोर (Bhor Assembly) मतदारसंघातील काही भाग येतो.
या मतदारसंघातील मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी ४ अपर पोलीस आयुक्त, ११ पोलीस उपायुक्त,२२ सहायक पोलीस आयुक्त, ६४ पोलीस निरीक्षक, ३११ सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, ५ हजार २५५ पोलीस अंमलदार, १ हजार ८७९ होमगार्ड, १५ केंद्रीय सशस्त्र पोलीस दल कंपन्या, २ राज्य राखीव दला कंपनी असा मोठा बंदोबस्त असणार आहे. याशिवाय आज रात्री संपूर्ण शहरभर नाकाबंदी, कोंबिंग ऑपरेशन आयोजित केले जाणार आहे.
शहरातील ७१६ इमारतींमध्ये ३ हजार ३३९ मतदान केंद्र आहेत. तर ५८ इमारतींमध्ये १० पेक्षा अधिक मतदान केंद्रे आहेत. पुणे जिल्ह्यातही सर्व मतदान केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्यामध्ये १ पोलीस अधीक्षक, २ अपर पोलीस अधीक्षक, ९ उपविभागीय पोलीस अधिकारी, ३५ पोलीस निरीक्षक, २८७ पोलीस उपनिरीक्षक, ३२४६ पोलीस अंमलदार यांचा बंदोबस्त राहणार आहे. केंद्रीय सशस्त्र दलाच्या ११ कंपन्या, २ हजार ६०० होमगार्ड, राज्य राखीव पोलीस दलाची एक कंपनी मदतीला असणार आहे. मतदान झाल्यानंतर मतदान केंद्रावरुन मतपेट्ट्या स्ट्राँग रुमपर्यंत पोहचविण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे.