Karjat Jamkhed Assembly Election 2024 | कर्जत जामखेडमधून शरद पवारांचे टीकास्त्र; म्हणाले – “राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले?

Sharad Pawar-Ram Shinde

कर्जत : Karjat Jamkhed Assembly Election 2024 | कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे (MVA Candidate) उमेदवार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या प्रचार सभेतून बोलताना शरद पवार यांनी राम शिंदेंवर (Ram Shinde) हल्लाबोल केला आहे. ” या तालुक्याला १० वर्ष एक आमदार होता, मंत्री होता, सत्ता हातात होती, त्यांनी १० वर्ष काय दिवे लावले?”, असे म्हणत शरद पवार (Sharad Pawar) यांनी निशाणा साधला आहे.

शरद पवार म्हणाले, ” कर्जत-जामखेड मतदारसंघातील कामाकडे रोहित पवारांचे लक्ष आहे. या तालुक्याला १० वर्ष एक आमदार होता, मंत्री होता, सत्ता हातात होती त्यांनी काय केलं १० वर्ष? मी मागे चौंडीत आलो, तिथे एक टोलेजंग बंगला बांधण्यात आलाय. मी विचार केला की, हा भाग तर दुष्काळी भाग आहे, तर हा बंगला कुणाचा असा प्रश्न मला पडला”, असं म्हणत शरद पवारांकडून राम शिंदे यांच्या चौंडीतील घरावरून टीका करण्यात आली.

ते पुढे म्हणाले, ” त्यांनी लोकांचा विकास केला नाही. स्वतःच्याच तुंबड्या भरल्यात. या मतदारसंघात विकास करायचा असेल तर या मतदारसंघात एमआयडीसी व्हायला हवी. २० तारीख ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. राज्याचा कारभार कुणाच्या हातात द्यायचा त्याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे”, असे शरद पवार यांनी म्हंटले आहे.