Devendra Fadnavis On Sharad Pawar | ‘पावसात भिजलं म्हणजे निवडून येता येतं असं नाही’, देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवारांना खोचक टोला

मुंबई : Devendra Fadnavis On Sharad Pawar | शरद पवार यांच्या २०१९ च्या साताऱ्यातील सभेने पूर्ण निवडणूक फिरवली होती. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर साताऱ्यात लोकसभेची पोटनिवडणूक लागली. तिथे श्रीनिवास पाटील यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. (Maharashtra Assembly Election 2024)
त्यानंतर श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार साताऱ्यात गेले. या प्रचार सभेवेळी अचानक पाऊस आला. भर पावसातही शरद पवार यांनी आपलं भाषण थांबवलं नाही. ते बोलत राहिले. तसेच सातारकरांची माफीही मागितली होती. (Mahayuti Vs Mahavikas Aghadi)
शरद पवार यांनी भर पावसात भाषण केलं. अन् या पावसाची महाराष्ट्रासह देशात चर्चा झाली. या निवडणुकीत श्रीनिवास पाटलांचा विजय झाला. यात शरद पवार यांच्या पावसातील सभेचा मोठा वाटा असल्याचं बोललं जातं.
या सभेची आठवण तीन दिवसांपूर्वी कोल्हापूकरांना झाली. कारण कोल्हापूर मध्ये अशीच पावसातली सभा पार पडली. त्यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, “महाराष्ट्रात मी सभेला बोलायला उभा राहिलो की पावसाची सुरुवात होते. त्यात मी बोलल्यानंतर निवडणुकीचा निकाल हा चांगला लागतो.”
दरम्यान आता या विधानावरून देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.” पावसात भिजलं म्हणजे निवडून येता येतं असं नाही”,असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ” आज काल आम्हाला काही लोक सांगत आहेत की पावसात भिजलो, आता निवडून येणार. मी त्यांना सांगतो आमच्याकडे तो पाऊस आहे, मतांचा. निवडून येण्यासाठी मतांचा पाऊस लागतो”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.