Vadgaon Sheri Assembly Election 2024 | वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ : बापुसाहेब हे सामान्यांचे आधार – खासदार नीलेश लंके

वडगावशेरीचा चेहरा मोहरा बदलेन: बापूसाहेब पठारे
वडगावशेरी: एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Vadgaon Sheri Assembly Election 2024 | वडगावशेरी मतदार संघाचे महविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) अधिकृत उमेदवार (MVA Candidate) बापूसाहेब पठारे (Bapu Pathare) यांच्या प्रचारासाठी आयोजित परिवर्तन महासभेत अहिल्यादेवीनगरचे खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी घणाघाती भाषण करुन पठारे यांच्या विजयाचे आवाहन केले. 50 हजार मतांनी ते निवडून येतील, हे विश्वासाने सांगितले.
महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. संविधानाची प्रत पठारे यांना भेट देण्यात आली. अनेक व्यक्ती, संघटनांनी पाठिंब्याचे पत्र दिले. वडगावशेरी हा मिनी इंडिया असून तो आदर्श करु, अशा भावना विविध वक्त्यांनी व्यक्त केल्या. मारुती गलांडे यांनी आभार मानले.
नीलेश लंके म्हणाले, या परिसराचे परिवर्तन व विकास हा बापूसाहेब पठारे यांनीच केला.
संकट समयी आधाराचे केंद्र बापूसाहेब पठारे यांनी निर्माण केले. नगरचे नागरिक येथे मोठया प्रमाणावर मतदार आहेत. ते तुतारी लाच मतदान करतील. खरे कार्यसम्राट बापूसाहेब आहेत, सामान्यांचे ते आधारवड आहेत. शरद पवार यांना झालेल्या त्रासाची भरपाई केली पाहिजे. सत्तारूढ लोक लबाड आहेत, महविकास आघाडी सत्तेवर येणार हि काळ्या दगडावरची रेघ आहे. पुढे शेतकरी, महिला, बेरोजगार वर्गासाठी काम करु.
बापूसाहेब पठारे म्हणाले, प्रतिस्पर्धी उमेदवार खोटारडा आहे . त्यांनी 10 कोटीची कामे दाखवावी,1500 कोटीची भाषा करु नये. पवार साहेब हे आमचे दैवत आहे. टँकर वापरल्याचा आरोप करणाऱ्यांनी पाण्याचा कधीच प्रश्न सोडवला नाही. आपण जिंकणार आहोत. आणि चांगले परिवर्तन या मतदारसंघात घडवणार आहोत.