Parvati Assembly Election 2024 | अपक्ष उमेदवार आबा बागुल यांच्या प्रचारार्थ अंबिका नगर येथे ‘विजयी निर्धार सभा’; म्हणाले – ‘मी चोवीस तास पर्वतीकरांसाठी उभा होतो, यापुढेही राहील’

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Parvati Assembly Election 2024 | पर्वती विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. महायुतीकडून (Mahayuti Candidate) माधुरी मिसाळ (Madhuri Misal), महाविकास आघाडीकडून (MVA Candidate) अश्विनी कदम (Ashwini Kadam) तर अपक्ष उमेदवार म्हणून आबा बागुल (Aba Bagul) निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
दरम्यान पर्वती विधानसभा मतदारसंघात आबा बागुल यांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय. सलग ६ वेळा ते नगरसेवक असलेले आबा बागुल आता आमदार व्हायचेच या इराद्याने कामाला लागले आहेत. बागूल पर्वतीमधील माता-भगिनींसह नागरिकांची घरोघरी जाऊन भेटीगाठी घेत आहेत. पदयात्रा, प्रचार रॅली, बैठका, सभा यांच्या माध्यमातून ते नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत.
दरम्यान अंबिका नगर भागातील राम मंदिरा जवळ, अप्पर येथे अपक्ष उमेदवार आबा बागुल यांच्या प्रचारार्थ हजारो नागरिकांच्या साक्षीने ‘विजयी निर्धार सभा’ पार पडली. यावेळी नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला.
यावेळी आबा बागुल म्हणाले, ” पर्वतीच्या हितासाठी ही निवडणूक लढतोय. प्रगतीसाठी, विकासासाठी, सर्वसामान्यांच्या उत्थानासाठी आपण मला जनाधाराची ताकद दिली पाहिजे. मी चोवीस तास पर्वतीकरांसाठी उभा होतो, यापुढेही राहील. तुमचे प्रश्न आणखी प्रभावीपणे सोडवण्यासाठी मला विधानसभेत पाठवा. २० नोव्हेंबर रोजी ‘हिरा’ चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी बागुल यांनी केले.