Bibvewadi Pune Crime News | पुणे: कलयुग ! पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी आलेल्या मॉडेलने लैंगिक अत्याचाराची धमकी देऊन फोटोग्राफरकडून उकळली खंडणी

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Bibvewadi Pune Crime News | पोर्टफोलियो तयार करण्यासाठी आलेल्या मॉडेलने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार करेन, अशी धमकी देऊन फोटोग्राफरकडून खंडणी उकळण्याचा (Extortion Case) धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी बिबवेवाडी येथे राहणार्या एका ४३ वर्षाच्या फोटोग्राफरने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी एका मॉडेलवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बिबवेवाडीतील फिर्यादीच्या फोटो स्टुडिओमध्ये ६ ते १५ नोव्हेबर २०२४ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे फोटोग्राफर असून त्यांचा फोटो स्टुडिओ आहे. आरोपी महिला मॉडेल असून त्या मुळच्या सोलापूरच्या राहणार्या आहेत. सध्या नर्हे येथे राहतात. त्यांना आपला पोर्टफोलियो तयार करायचा होता. त्यासाठी त्यांनी फिर्यादी यांना पोर्टफोलियो तयार करण्यास सांगितले होते. त्यासाठी लागणार्या फोटो शुटसाठी त्या ६ नोव्हेबर २०२४ रोजी फिर्यादीच्या फोटो स्टुडिओमध्ये गेल्या होत्या.
त्यावेळी फिर्यादी यांनी आता लगेच फोटो शुट होणार नाही. आपण नंतर फोटो शुट करु, असे सांगितले. त्यावर नाराज होऊन या मॉडेलने तुझ्यावरतील ३७६ ची केस करेन अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांच्याकडे वारंवार पैशांची मागणी केली. तिच्या धमकीला घाबरुन त्यांनी या मॉडेलला २० हजार रुपये दिले. तरी देखील ती परत पेशांची मागणी करत होती. पैसे दिले नाही तर तुझ्या स्टुडिओ मध्ये येऊन मारेन, असे शिवीगाळ करीत धमकी देत आहे. त्यामुळे शेवटी फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली आहे. पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक विद्या सावंत तपास करीत आहेत.