Parvati Assembly Election 2024 | पर्वती मतदारसंघातील मविआच्या उमेदवार अश्विनी कदम यांना मातंग एकता आंदोलन संघटनेचा जाहीर पाठिंबा

पुणे : Parvati Assembly Election 2024 | राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. २० नोव्हेंबरला मतदान असल्याने आता अवघे सात दिवस बाकी आहेत. त्यामुळे प्रचाराला वेग आला आहे. सभा, बैठका, पदयात्रा, रॅलीच्या माध्यमातून उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत.
पर्वती विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीकडून अश्विनी कदम (Ashwini Kadam), महायुतीकडून माधुरी मिसाळ (Madhuri Misal) तर अपक्ष उमेदवार म्हणून आबा बागुल (Aba Bagul) निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
२० नोव्हेंबरला मतदान असल्याने आता प्रचारासाठी अवघे दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे मतदारसंघात उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. दरम्यान महाविकास आघाडीच्या उमेदवार अश्विनी कदम यांना मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटना व मातंग समाजाच्या विविध संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
मातंग एकता आंदोलन संघटनेचे कार्याध्यक्ष अविनाश बागवे, राज्याचे समन्वयक विठ्ठलराव थोरात, महिला आघाडीच्या शहर उपाध्यक्षा रुक्मिणी धेडे, रावसाहेब खवळे, राजू गायकवाड, सचिन जोगदंड, रवी क्षीरसागर तसेच अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.