Vadgaon Sheri Assembly Election 2024 | “वडगावशेरीचा चेहरामोहरा बदलून महापरिवर्तन घडवून आणण्याचा ध्यास”, बापूसाहेब पठारेंच्या प्रचारार्थ पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : Vadgaon Sheri Assembly Election 2024 | राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून राज्यभर प्रचारसभा, प्रचारफेऱ्यांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. नेत्यांच्या बैठकी, सभा, रॅली, पदयात्रा सुरु आहेत. सर्वपक्षीयांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. २० नोव्हेंबरला मतदान असणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी कमी कालावधी उरला आहे.
दरम्यान आज (दि.१५) महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे (Bapu Pathare) यांच्या प्रचारार्थ श्री सिद्धीविनायक मेंटल क्वार्टर, राजीव गांधी नगर, रणकपूर दर्शन, शांतीनगर, पोरवाल पार्क, कतारवाडी (भारतनगर), पोलीस वसाहत, फुलेनगर, राम सोसायटी, हरी गंगा, करुणा सोसायटी, पर्णकुटी सोसायटी, अहिल्या सोसायटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटी, इंदिरा नगर ह्या परिसरात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
या पदयात्रेत महिलांनी औक्षण करत बापूसाहेब पठारे यांचे स्वागत केले. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या पदयात्रेत सहभाग घेतला. यावेळी मोठ्या संख्यने नागरिक उपस्थित होते.
बापूसाहेब पठारे म्हणाले, “वडगावशेरीचा चेहरामोहरा बदलून महापरिवर्तन घडवून आणण्याचा ध्यास जनतेने घेतला आहे. पदयात्रेच्या निमित्ताने परिसरातील नागरिकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न अडचणी समजून घेता आले. आगामी काळात या प्रश्नांवर, अडचणीवर आपण नक्कीच मात करू असे आश्वासन नागरिकांना दिले आहे.