Pune Pimpri Chinchwad Crime News | खुन करुन त्यांनी गुन्हा पचवला होता पण़…; आपल्याच गुन्ह्याचे त्यांनी केले शुटींग आणि अडकले पोलिसांच्या तावडीत

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | दारु पिऊन आई वडिलांना त्रास देतो, म्हणून तिने आपल्या मावस भावांना बोलावले. त्यांनी त्याचा पायाने गळा दाबुन खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी मृतदेह जाळून टाकला. दारुच्या नशेत थंडीत काकडून मेल्याचे त्यांनी गावकर्यांना सांगितले. त्याच्या मृतदेह जाळून टाकला. गावकर्यांनाही त्याचा त्रासच होत असल्याने कोणी काही बोलले नाही. त्यांनी गुन्हा जवळपास पचविलाच होता. परंतु, त्यांनी गुन्हा करताना आपल्याच हातातील मोबाईलवर शुटिंग करुन पुरावा तयार केला आणि पोलिसांच्या तावडीत सापडले. तळेगाव पोलिसांनी (Talegaon Dabhade Police) महिलेसह तिघांना अटक केली आहे. (Murder Case)
सोमनाथ रघुनाथ काळे (वय ३६, रा. नानोली, ता. मावळ) असे खुन झालेल्याचे नाव आहे. मंगेश गोविंद दाभाडे (वय ३६), तनेष साईनाथ दाभाडे (वय १९, दोघे रा. कोटेश्वरवाडी, ता. मावळ) व महिला (वय ४०, रा. ब्राम्हणवाडी ता. मावळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक शाम मस्के यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार मावळ तालुक्यातील नानोली गावात २६ ऑक्टोंबर रोजी घडला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ काळे हा दारु पिऊन येऊन आपल्या आई वडिलांना त्रास देतो, या कारणावरुन महिलेने आपले मावस भाऊ मंगेश आणि तनेष दाभाडे यांना घरी बोलावून घेतले होते. दारुच्या नशेत असलेल्या सोमनाथ काळे याच्या गळावर पायाने दाबून खुन केला. त्यानंतर त्यांनी सोमनाथ काळे याचा दारुच्या नशेत थंडीमुळे काकडून मृत्यु झाल्याचे गावात सांगितले. गावकर्यांनाही त्याचा त्रासच होत असल्याने कोणीही संशय व्यक्त केला नाही. त्यांनी सोमनाथ काळे याच्यावर अंत्यसंस्कार केले. खुन केल्यानंतर त्याचा पुरावाही त्यांनी नष्ट करुन खुन पचविला होता. त्यांना वाटले आपल्यावर कोणाचा संशय नाही. मात्र, हे सर्व करताना तनेष याने व्हिडिओ शुटिंग केले होते. त्याने तो काही जणांना दाखविलाही होता. याची खबर तळेगाव एमआयडीसीच्या पोलिसांना लागली. त्यांनी तनेष दाभाडे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील मोबाईलमध्ये खुन करतानाचा व्हिडिओ आढळून आला. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तिघांना अटक केली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव तपास करीत आहेत.